logo

जीव ओतून काम करा

परत देणे

Snap मध्ये, कार्य आणि समुदायामध्ये — चिरस्थायी प्रभाव पाडण्यासाठी बऱ्याच संधी आहेत!
आमचे देणारे कार्यक्रम तीन प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित करतात: तरुण सक्षमीकरण, शिक्षण आणि कला सक्षम करणे. Snap कॅम्प (समुदाय, कला आणि मार्गदर्शन प्रकल्प) द्वारे आम्ही दरवर्षी हजारो तास स्वयंसेवा करतो. आम्ही नवीन मातांना घरे नूतनीकरण करून देत आहोत किंवा गरजू महिलांना विनामुल्य कोडिंग वर्ग ऑफर करत आहोत, आम्ही परत देण्यासाठी नेहमी नवीन मार्ग शोधत असतो.
आमच्या पुरस्कृत स्वयंसेवक प्रकल्पांसह, आमच्या देण्याच्या तीन स्तंभासोबत सहमत असलेल्या त्यांच्या निवडीच्या धर्मादाय प्रकल्पामध्ये स्वयंसेवा करण्यासाठी Snap टीम सदस्य दरमहा पगारी वेळ देखील घेऊ शकतात. परत देण्यासाठी आम्हाला तुमची मदत करायची आहे, तुमच्या मार्गानी!

Snap परिषद

गोष्टी सामायिक करण्यासाठी, लक्षपूर्वक ऐकण्यासाठी, आणि मनातले बोलण्यासाठी एकत्र येणाऱ्या लोकांची ही परिषद आहे. कोणताही व्यत्यय न येता टीम मधील सदस्यांना बोलण्याची संधी मिळते, ज्यामुळे प्रत्येक सदस्याला नीट ऐकता येते. गोष्टी सांगितल्या जातात, त्यामुळे इतर सदस्य मनापासून ऐकतात. हे सर्वसमावेशक कामाचे वातावरण देते जिथे लोकांना आपुलकीची भावना मिळते.
आम्ही एक जागतिक कंपनी जी समस्या सोडवत आहे — त्यामुळे आम्ही प्रत्येक भावनेला संवादात सहभागी करून घेतो आणि एकमेकांना ऐकण्याची आमची क्षमता अधिक दृढ करतो.

Snap च्या टीममध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहात?